Pune News : …तर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातून निवडून आणू : संजय काकडे

एमपीसी न्यूज : ‘मी पुढील निवडणूक कोल्हापूर मधून लढविणार,’ असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी कोल्हापुरातून निवडणूक लढविली तर त्यांच्या निवडणुकीचा मीच प्रचार प्रमुख असेल. त्यांना आम्ही पुन्हा बहुमताने निवडून आणू, असा विश्वास भाजपाचे सहयोगी सदस्य, माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ‘मी कोल्हापूरला जाणार’, या विधानावर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाली होती. त्यावर स्वतः चंद्रकांत पाटील यांनी खुलासा देखील केला. मात्र, आता भाजपचे माजी सहयोगी खासदार संजय काकडे यांनी तोच धागा पकडत हे धक्कादायक वक्तव्य केले.

तसेच औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या नामांतराबाबत खा.काकडे म्हणाले, राज्यात कोरोनामुळे मागील दहा महिन्यापासून अनेक तरुणांच्या हाताचे रोजगार गेले आहे. त्यामुळे राज्य सरकारने तरुणाच्या हाताला रोजगार मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावे. पण हे सरकार औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही ठिकाणीचे नामांतर करण्याकडे लक्ष देत आहे.

या मोठ्या नेत्यांनी नामांतर विषय बाजूला ठेवून प्रथम तरुणाला रोजगार द्याव तसेच नामांतर केल्याने काहीही फरक पडणार नाही. त्यासाठी एखादी समिती नेमावी आणि ती समिती त्यावर काम करेल, अशी भूमिका काकडे यांनी मांडली.

महाविकास आघाडीच्या कारभाराबाबत काकडे म्हणाले, राज्य सरकार स्थिर दिसत आहे. मी काही भविष्य सांगू शकत नाही. तसेच आमचे कोणतेही नगरसेवक पक्षांतर करणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

प्रत्येक पक्षात काही प्रमाणात नाराजी असते. त्यामुळे आज चर्चा सुरू झाली की भाजपचे 19 नगरसेवक महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत. मात्र, आमचे भाजपचे 98 नगरसेवक इतर कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाहीत. पक्षबदलाच्या काही जण अफवा पसरवीत असल्याचे माजी खासदार संजय काकडे यांनी आवर्जून सांगितले. तसेच निवडणुका जवळ आल्या की, अशा चर्चांना सुरुवात होते असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.