Pune News : माथाडी नेते निलेश माझीरे यांच्या पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पुणे मनसेमधून बाहेर पडलेले  माथाडी नेते निलेश माझीरे (Pune News) यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कायक घटना गुरुवारी रात्री घडली आहे.

निलेश माजरे हे माथाडी कामगार सेनेचे नेते आहेत. त्यांच्या पत्नीने बुधवारी विष प्राशन केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Pune Crime News : सराईत गुन्हेगार टोळीवर मोका

आत्महत्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याचा संशय आहे.

निलेश माजरे यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’करत जवळपास 400 कार्यकर्त्यांना (Pune News) सोबत घेवून बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.