Pune news: सणस मैदानासमोर ऑलिम्पिक वॉल उभारणार 

एमपीसी  न्यूज: बाबुराव सणस मैदानावरील संग्रहालयाच्या इमारती समोरली दर्शनी भिंतीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरची ऑलिम्पिक वॉल करण्यासाठी स्थायी समितीने आज मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, या भिंतीवर ऑलिम्पिक पदक विजेत्या भारताच्या १३५ खेळाडूंची नावे कोरण्यात येणार आहेत. त्यामुळे युवा आणि होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे. महापालिकेच्या क्रीडा समितीच्या वतीने प्रशासनाने हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.