Pune News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने सामान्य माणसाचा विचार केला : प्रकाश जावडेकर

एमपीसी न्यूज – आयुष्मान भारत आणि जनऔषधी या गोरगरीबांना आणि मध्यमवर्गीयांना मदत करणाऱ्या सर्वात मोठ्या आरोग्य योजना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने सामान्य माणसाचा विचार केला आणि ज्यांच्या घरात आजारपण येते त्या घरावर किती वाईट परिणाम होतो हे लक्षात घेऊन त्यापासून त्या घराला वाचविण्यासाठी या दोन योजना लागू झाल्या असे मत माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

कोथरुड येथे आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आरोग्य विमा कार्डचे जावडेकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले या वेळी ते मार्गदर्शन करीत होते. नगरसेवक दिलीप वेडे पाटील, किरण दगडे पाटील, अल्पना वरपे आणि डॉ. श्रद्धा प्रभुणे-पाठक यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

जावडेकर म्हणाले, ‘आयुष्मान योजनेत 50 कोटी लोकांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील अशाप्रकारची जगातील ही सर्वात मोठी आरोग्य योजना आहेत. आजपर्यंत अडीच कोटींहून अधिक लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचार मिळाले हा योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे. जनऔषधी केंद्रांवर शंभर रुपयांच्या गोळ्या वीस रुपयांत मिळतात. याने गरीबाला आजारपणासाठी कर्ज घ्यावे लागत नाही.’

जावडेकर पुढे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गरीबीमध्ये वाढले असल्यामुळे गोरगरीबांच्या आणि मध्यमवर्गीयांच्या समस्या त्यांना माहित आहेत त्यामुळे सत्तर वर्षांत जी योजना झाली नाही अशी आरोग्य सेवेची गॅरंटी देणारी योजना चालू केली त्याची चार वर्षे सफलतेने गेली हे फार महत्त्वाचे आहे.

हृदयाचे स्टेन्स, बदलण्याचे गुडघे आणि इतर यंत्रसामग्री मोदीजींनी स्वस्त केली. त्याचबरोबर खेड्यापाड्यात वेलनेस सेंटर सुरू करून तिथेही उत्तम आरोग्याची व्यवस्था उभी केली. लोकांनी आजारी पडू नये, त्याला हॉस्पिटलमध्ये जायला लागू नये अशी सरकारची इच्छा आहे. परंतु तशी वेळ आल्यास मोदी सरकार त्यांच्यामागे ठामपणे उभे आहे हाच मोदींचा मंत्र आहे.’

सात ऑक्‍टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. लोकांच्या पाठींब्यावर आणि आशीर्वादाने तेरा वर्षे ते मुख्यमंत्री राहीले आणि गेली सात वर्षे ते प्रधानमंत्री आहेत. या मुळे त्यांची वीस वर्षे सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर राहाण्याची पूर्ण होत आहे. लोकशाहीत हा एक विक्रम आहे. ही जनसेवा त्यांच्याकडून अखंड सुरू राहील, असा मला विश्वास असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.