Pune News : मुंबई-पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज सकाळी आढे (Pune News) गावाच्या हद्दीत किलोमीटर 82 जवळ कारचा भीषण अपघात झाला. समोर जाणार्‍या मालवाहू ट्रकला कारने मागून जोरात धडक दिल्याने झालेल्या या अपघातात कारमधील तीघांचा मृत्यू झाला आहे. अतिशय भीषण असा हा अपघात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेली कार क्र. (MH 04 JM 5349) ही किमी 82 जवळ समोर जाणारा ट्रक क्र. (RJ 09 JB 3638) ला मागून जोरात धडकली.

यामध्ये जवळपास अर्धी कार ट्रकच्या मागील बाजुने (Pune News)/ट्रकखाली गेली. चालकासह दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा व महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने वाहने बाजुला करत कार मधील सर्वांना बाहेर काढले.

Aundh News: कर्जात बुडल्याने आयटी इंजिनिअरने स्वत:सोबत पत्नी आणि मुलाची केली हत्या

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.