_MPC_DIR_MPU_III

Pune News : क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र स्पोर्टस् इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलेपमेंट प्लॅन अंतर्गत राज्यात क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा असे, निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

_MPC_DIR_MPU_IV

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय क्रीडा संकुल, येरवडा व जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथील विविध कामांचा आढावा घेण्यासाठी विभागीय व जिल्हा क्रीडा संकुल समितीची आढावा बैठक व्ही.व्ही. आय.पी. सर्कीट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अजित पवार बोलत होते.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान, माहिती उपसंचालक राजेंद्र सरग, बारामतीचे मुख्‍याधिकारी किरण यादव यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.

बैठकीत प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त कायम करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर आमंत्रित सदस्य निश्चित करणे. क्रीडा संकुलाच्या जमाखर्चाचा आणि क्रीडा संकुल येथील सुविधांचा आढावा घेणे, क्रीडा संकुल येथील प्रस्तावित करण्यात आलेल्या सुविधा तसेच क्रीडा संकुलाकरीता वास्तुशास्त्रज्ञ यांच्या नियुक्ती करणे. युवा वसतिगृहाची स्थापना करणे. क्रीडा संकुलाकरीता उर्वरीत रकमेची मागणी करण्यापूर्वी उपलब्ध जागेचा आढावा घेणे. बॅडमिंटन हॉल व जलतरण तलाव येथील प्रेक्षक गॅलरीमध्ये पायऱ्यांवर खुर्च्या बसविणे. अर्बन इन्फाकॉम या संस्थेचे कोरोना कालावधीतील भाडे शुल्क कमी करणे. प्रा. शिवाजी साळुंके यांनी सादर केलेला प्रस्ताव. योग अकॅडमी करीता हॉल भाडे तत्त्वावर देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

मागील बैठकीचे इतिवृत्त व बैठकीचे प्रास्ताविक क्रीडा व युवक सेवा उपसंचालक तथा सदस्य सचिव विजय संतान यांनी सादर केले

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.