Pune News : मालमत्ता कर 50% कमी करा : उज्ज्वल केसकर

एमपीसी न्यूज – सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MMC Act कलम 133 A मध्ये दिलेल्या अधिकाराचा वापर करून पुणेकर, व्यावसायिक दुकानदार आणि इतर लोकांचा मालमत्ता कर 50% कमी करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षने आणि सुहास कुलकर्णी यांनी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे बुधवारी केली.

अशा प्रकारे निर्णय घेणारी पुणे मनपा ही पहिली मनपा असेल. यात कमी होणारे नुकसान राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांकडून 25% प्रत्येकी मिळवून घेता येईल. पुणेकरांनी आपल्या पक्षावर विश्वास दर्शविला आहे. खासदार, आमदार, नगरसेवक म्हणून निवडून दिले आहेत. त्यांना दिलासा दिला पाहिजे. याकामी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य मिळू शकते, कारण त्यांचेही नगरसेवक मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी निवडून दिले आहेत.

तसेच, दोन आमदारही निवडून आले आहेत. या प्रस्तावित योजनेचा विचार करून पुणेकरांना दिलासा द्यावा, असेही उज्ज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी म्हटले आहे. एका असाधारण परिस्थितीतून आज देश मार्गक्रमण करीत आहे. कोरोनाच्या महामारीने सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड आर्थिक विवंचना भासते आहे.

नरेंद्र मोदी सरकारने मोठे आर्थिक पॅकेज दिले आहे. महाराष्ट्र शासनाने अद्याप पॅकेज दिले नाही. स्थायी समिती अध्यक्ष आपण मालमत्ता कर वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्यादृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. स्तुत्य उपक्रम आहे, असेही त्यांनी सांगितले. महापौर, उपमहापौर, सभागृह नेते, खासदार, सर्व आमदार पुणे, प्रधान सचिव नगरविकास 2, मनपा आयुक्त यांना या निवेदनाची प्रत देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.