Pune News: महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद; 80 टक्के पुणेकरांनी केले घरीच विसर्जन

91 मूर्ती संकलन केंद्रांवर 55 हजार 549 मूर्ती संकलित करण्यात आल्या. ज्यांना घरी विसर्जन शक्य नव्हते, त्यांनी फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन केले.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणरायाचे घरीच विसर्जन करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले होते. त्याला पुणेकरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. सुमारे 80 टक्के पुणेकरांनी घरीच गणरायाचे विसर्जन केले. 55 हजार मूर्ती पुणे महापालिकेतर्फे संकलित करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या 214 केंद्रातून 14 हजार किलो अमोनियम बायकार्बोनेट पावडरचे वितरण करण्यात आले. 191 मूर्ती संकलन केंद्रांवर 55 हजार 549 मूर्ती संकलित करण्यात आल्या. ज्यांना घरी विसर्जन शक्य नव्हते, त्यांनी फिरत्या विसर्जन हौदात विसर्जन केले. महापालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये, घनकचरा व्यवस्थापन विभाग व काही नगरसेवकांच्या पुढाकारातून 112 फिरते हौद उपलब्ध करून देण्यात आले होते.

या हौदात 61 हजार 708 मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. 191 निर्माल्य संकलन केंद्रांवर 54 हजार किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. ‘स्व-रूपवर्धिनी’च्या माध्यमातून प्रतिबंधित क्षेत्रातील वस्तीत जाऊन योग्य सुरक्षा घेत पर्यावरणपूरक गणेश विसर्जन अभियानात उत्साहाने काम केले.

यामध्ये रमणबाग, श्री राम पथक व ज्ञान प्रबोधिनीसह अन्य 12 पथकांतील युवा वादकांचा उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने पुणेकरांनी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला. हे कोरोनाचे विघ्न दूर करून पुढील वर्षी बाप्पा धुमधडाक्यात या, असे साकडे पुणेकरांनी गणरायाला घातले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.