Pune News : कोरोनामुळे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, बळींची संख्या ७

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस कोरोनामुळे शहर पोलीस दलातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. अशातच आता कोरोनामुळे निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला आहे.

त्यांच्यावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. संतोष जगन्नाथ गायकवाड (वय 58) असे मृत्यू झालेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाचे नाव आहे.

गायकवाड हे शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. 31 ऑगस्ट रोजी ते पोलीस दलातून निवृत्त झाले होते. सेवा निवृत्तीच्या दिवशीच त्यांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची कोरोनाची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असताना काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कोरोना काळात पुणे शहर पोलीस दलातील हा सातवा बळी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.