Pune News : धक्कादायक! पुण्यातील गुगल ऑफिस बॉम्बने उडवण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पुण्यातील गुगल ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये बॉम्ब ठेवल्याचा (Pune News) फेक कॉल आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील गुगल ऑफिसमध्ये पुण्यात कोरेगाव पार्कमध्ये असलेल्या गुगल ऑफीसमध्ये बॉम्ब असल्याचा हा कॉल आला होता.

कॉल येताच बॉम्ब शोधक पथकाकडून काल रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. परंतु, यावेळी कुठलीही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली.

Mumbai : आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हमाने यांना पंतप्रधान मोदींनी दिली शाब्बासकीची थाप

ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता, त्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची (Pune News) प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.