Pune news : मोफत प्लास्टिक सर्जरी शिबीरातून 75 जणांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

एमपीसी न्यूज- अग्रवाल क्लब चॅरिटेबल ट्रस्ट व आर. एम. धारिवाल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय (Pune news) मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरातून 75 जणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.जन्मतः असलेल्या व्यंगामुळे जीवनात दुखी व हतबल असण्याऱ्या लोकांच्या जीवनात पुन्हा नवी उमेद जागिवण्याचे काम प्रसिद्ध हॅन्ड सर्जन डॉ. पंकज जिंदाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

 

शिरूर येथील मातोश्री मदनबाई धारिवाल हॉस्पिटलमध्ये झालेल्या या शिबिरामध्ये 75 हुन अधिक रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. एक हॅन्ड सर्जन ,तीन प्लास्टिक सर्जन व पाच भूलतज्ज्ञ यांच्या टीमने ही कामगिरी केली. जन्मतः असलेले व्यंग, दुभंगलेले ओठ, वाकडी बोटे, वाकड्या नाकात सुधारणा, हनुवटीच्या आकारात बदल, गोंदण, मस व चेहऱ्यावरील व्रण आदी गोष्टींवर प्लास्टिक व कॉस्मेटिक सर्जरी करण्यात आली.

Pimpri News : इन्स्पायर अबॅकस अकॅडमी च्या वतीने राष्ट्रीय पातळीची अबॅकस स्पर्धा 

 

शिबिराच्या उद्घाटनावेळी पुण्याचे जीएसटी आयुक्त दिलीप गोयल, आर. एम. धारीवाल फ़ाउंडेशनच्या उपाध्यक्ष शोभा धारीवाल, अग्रवाल क्लबचे अध्यक्ष उमेश अग्रवाल, प्रकल्प संचालक उमेश जालान, प्रकल्प सहसमन्वयक राजीव अग्रवाल, चैरिटी डायरेक्टर मोहन अग्रवाल, रुग्णालयाचे मुख्य कार्यकारकी अधिकारी अरविन्द जैन, प्रशासकीय प्रमुख वंदना सागवेकर यांच्यासह रुग्णालय स्टाफ व अग्रवाल क्लबचे (Pune news) पदाधिकारी उपस्थित होते.

 

डॉ. पंकज जिंदल गेल्या 20 वर्षांपासून ग्रामीण भागातील अशा रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करत आहेत. चाळीसगाव, जळगाव, शहादा, शिर्डी, जालना, रायपूर आदी जिल्यांमध्ये त्यांनी शस्त्रक्रिया शिबीर घेतले आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांची आर्थिक परिस्थिती व माहितीचा अभाव यामुळे असे रुग्ण नकारात्मक भावनेने जीवन जगतात. त्यांच्यात आत्मविश्वास नसतो. सामाजिक कार्यक्रमांतही त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. त्यांना सन्मानाने व आत्मविश्वासाने जगण्याची संधी या शिबिरांमुळे मिळत आहे, अशी भावना डॉ. पंकज जिंदल (Pune news) यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.