Pune Crime News : दोन टोळ्यांमध्ये तलवार व कोयता हल्ला,दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज- पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात( Pune Crime News)दुचाकी वेगाने चालविल्याच्या कीरकोळ कारणावरून दोन गुंडांच्या टोळ्यांनी एकमेकांवर तलवार आणि कोयत्याने हल्ला केला.या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रार दिल्याने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून  दहशत पसरविणाऱ्या दोन्ही टोळ्यांमधील सातजणांना अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

ही घटना मार्केटयार्डमधील आंबेडकरनगरमध्ये रविवारी भरदिवसा घडली.  याप्रकरणी अनिलसिंग ऊर्फ सिंकदरसिंग टाक (वय 21, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दत्ता भिसे (वय 29), नितीन भिसे (वय 19), विजय भिसे (वय 24) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता भिसे याचा पुतण्या आकाश भिसे हा फिर्यादी टाक याच्या घरासमोरुन दुचाकी भरधाव वेगाने चालवत होता. त्यावेळी त्यांनी त्याला गाडी हळू चालव, असे सांगितले. त्याचा राग आल्यामुळे दत्ता भिसे यांच्यासह सात-आठजण हातात कोयते व काठ्या घेऊन आले. त्यांनी टाक याला कोयता आणि काठीने मारहाण करून गंभीर ( Pune Crime News)जखमी केले.

Pune News: उद्या सुवर्णपाळण्यामध्ये होणार गणेश जन्म सोहळा-श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट

तर, दुसऱ्या गटातील दत्ता महादेव भिसे (वय 39, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पिटुसिंग दुधानी (वय 38), अनिलसिंग सिकंदरसिंग टाक (वय 21), सिकंदरसिंग राजूसिंग टाक (वय 40) आणि रोहित दुधानी (वय 19) अशी त्यांची नावे आहेत. फिर्यादी दत्ता भिसे हा त्याच्या घरासमोरुन जात होता. त्यावेळी अनिलसिंग टाक याने शिवीगाळ करुन तलवारीने हल्ला करुन गंभीर जखमी केले. अधिक तपास मार्केटयार्ड पोलिस( Pune Crime News) करत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.