Pune News : पुण्यात सोमवारी 117 केंद्रावर लसीकरण ; आज रात्री आठपासून बुकिंग

सहा केंद्रावर 18 ते 45 तर, 111 केंद्रावर 45 वर्षांवरील नागरिकांना लस

एमपीसी न्यूज – पुण्यात सोमवारी (दि.10) 117 केंद्रावर लसीकरण सुरू राहणार आहे. सहा केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस दिली जाणार असून त्यापैकी 2 केंद्रांवर कोविशील्ड तर 4 केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 101 केंद्रांवर कोविशील्ड तर 10 केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीटवर द्वारे दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.10) पुण्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी सहा केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी आज रविवारी (दि.09) रात्री आठ वाजता लसीकरणासाठी अपॉईंटमेंट / स्लॉट बुकिंग करता येईल. केवळ बुकिंग केलेल्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे त्यामुळे स्लॉट बुक करणे आवश्यक आहे.

उद्या (सोमवारी) सुरू असलेल्या केंद्रामध्ये कमला नेहरू हॉस्पिटल, मंगळवार पेठ – कोव्हीशिल्ड लसीचे 500 डोस, राजीव गांधी हॉस्पिटल, येरवडा – कोव्हीशिल्ड लसीचे 500 डोस ; आण्णासाहेब मगर हॉस्पिटल, हडपसर – कोव्हॅक्सिन लसीचे 500 डोस ; जयाबाई सुतार दवाखाना, कोथरूड – कोव्हॅक्सिन लसीचे 500 डोस; मुरलीधर लायगुडे हॉस्पिटल- कोव्हॅक्सिन लसीचे 500 डोस, धायरी व ससुन हॉस्पिटल, स्टेशन रोड – कोव्हॅक्सिन लसीचे 200 डोस यांचा समावेश आहे.

45 वर्षांवरील नागरिकांसाठी सोमवारी 111 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 101 केंद्रांवर कोविशील्ड तर 10 केंद्रांवर कोवॅक्सिन उपलब्ध असेल. प्रत्येक केंद्रावर लसीचे फक्त शंभर डोस उपलब्ध असतील.

कोवॅक्सिन उपलब्ध असणाऱ्या 10 केंद्रांवर 12 एप्रिल 2021 पूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाईल. कोविशील्ड उपलब्ध असणाऱ्या केंद्रांवर 22 मार्च 2021 पूर्वी पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांना प्राधान्य असेल. तसेच, अपॉइंटमेंटनुसार येणाऱ्या 20 टक्के नागरिकांना पहिला डोस दिला जाणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हंटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.