Pune News : संघटीत, असंघटित महिला कामगारांसाठी लसीकरण शिबिरे भरवणार – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील भाऊ-बहिणींना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. तसेच या सणानिमित्त वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमाची माहिती दिली.

उपक्रमात प्रमुख्याने स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून संघटीत आणि असंघटीत महिला कामगारांसाठी लसीकरण शिबिरे भरवण्यात येणार आहेत. प्राथमिक स्तरावर मुंबई, पुणे आणि संभाजीनगरमध्ये पुढच्या आठवड्यापासून हे शिबिर सुरू होणार. ‘स्वयंसिद्धा भाग दोन’ या कार्यक्रमाची देखील घोषणा त्यांनी केली. यात कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना अपेक्षीत असलेल्या मदतीचे सर्वेक्षण करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येतील. या कामात आपर्णा पाठक, झेलम जोशी या समन्वयक म्हणून तर फरिदा लांबे, मेधा कुलकर्णी, मृणालिनी  जोग आदींचे सहकार्य असेल असेही त्या म्हणाल्या.

डॉ. गोऱ्हे  यांनी कामगार सेनेच्या माध्यमातून हजारोंना  रोजगार उपलब्ध करून त्यांच्या संसाराला मोलाची साथ देत असलेले शिवसेना उपनेते, रघुनाथ कुचिक यांना आज रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधली. तसेच  सत्कार केला. कुचीक यांनी त्यांच्या संकल्पनेतून प्रकाशित केलेल्या शिवसेना; अस्मिता-संघर्ष –वाटचाल हे पुस्तक डॉ. गोऱ्हे यांना भेट दिले.

डॉ. गोऱ्हे यांनी आजच्या सैन्य दलात, पोलीस खात्यात, एन.डी.ए या सोबत विविध सुरक्षा दलाच्या माध्यमातून तमाम रक्षणकर्ता भाऊ-बहिणींचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.