Pune News : फुगेवाडी येथे मेट्रोचे ऑपरेशनल कंट्रोल सेंटर सुरू, मेट्रो सुरू होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल

एमपीसी न्यूज – मेट्रोमध्ये बसण्याचे पुणेकरांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. प्राधान्य मार्गावर  ‘ट्रायल रन’ यशस्वी झाल्यानंतर मेट्रोने स्टेशनच्या कामाला वेग दिला असून सामन्यासाठी  मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रकडून ‘ऑपरेशनल कंट्रोल सेंटर’ सुरू करण्यात आले आहे.

शहरात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट व वनाज ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये मेट्रो रेल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हा मार्ग एकंदर 31 किमीचा असून त्यात 6 किमी लांबीचा कृषी महाविद्यालय ते स्वारगेट हा भुयारी मार्ग आहे. यामध्ये संत तुकारामनगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालयदरम्यान अनुक्रमे सहा आणि पाच किलोमीटरचा मार्ग प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित केले. या दोन्ही मार्गावर ट्रायल रन पर पडली आहे.

आता दोन्ही मार्गांवर स्टेशनची कामे झपाट्याने पूर्ण केली जात आहेत. पुढील काही महिन्यांत पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोतून प्रवास करता यावा, यासाठी मेट्रोच्या विविध तांत्रिक चाचण्या सध्या घेतल्या जात आहेत. प्रत्यक्ष प्रवाशांसाठी मेट्रोची सेवा सुरू झाल्यानंतर त्याचे संचलन, नियंत्रण सुलभ व्हावे आणि नागरिकांना मेट्रोशी संबंधित सर्व माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी ‘ऑपरेशन कंट्रोल सेंटर’चे काम अत्यंत महत्त्वाचे ठरते.

महामेट्रोच्या मूळ नियोजनानुसार रेंजहिल्स येथील डेपोच्या जागेतच मुख्य ओसीसी उभारण्यात येणार आहे. मात्र, प्राधान्य मार्गावरील सेवा येत्या वर्षअखेरपर्यंत सुरू करण्यात येणार असल्याने त्यासाठी फुगेवाडी येथील मेट्रो स्टेशनच्या परिसरातच तात्पुरत्या स्वरूपातील कंट्रोल सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरमध्ये मेट्रोच्या संचलनासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. त्याशिवाय प्रत्येक मेट्रो स्टेशनवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर येथून लक्ष ठेवले जाते. नागरिकांना कोणतीही समस्या उद्भविल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत ‘पॅनिक बटण’ दाबल्यास त्यांना थेट ‘ओसीसी’मधील ऑपरेटरशी संपर्क साधता येणे शक्य होणार आहे. तसेच नागरिकांना कोणतीही समस्या उद्भविल्यास किंवा आपत्कालीन स्थितीत ‘पॅनिक बटण’ दाबल्यास त्यांना थेट ‘ओसीसी’मधील ऑपरेटरशी संपर्क साधता येणे शक्य होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.