Pune News : गुरुवारी वारजे आणि चांदणी चौक परिसरातील पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज : वारजे जलकेंद्राच्या अख्यातारित्या (Pune News) येणाऱ्या गांधी भवन टाकीवरील कोथरूड परिसर व चांदणी चौक (चौकोनी) टाकीवरील बावधन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाण्याच्या लाईनला फ्लो मीटर बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे गुरुवार दिनांक 29 डिसेंबर रोजी वारजे आणि चांदणी चौक परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी 30 डिसेंबर रोजी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

पाणीपुरवठा बंद असणारा वारजे जलकेंद्रातील भाग – Pune News

कोथरूड परिसर, महात्मा सोसायटी परिसर, भुजबळ टाऊनशिप, एकलव्य कॉलेज परिसर, कुमार परिसर, गणंजय सोसायटी, रोहन गार्डन परिवार, कोथरूड वार्ड ऑफिस परिसर, अथर्ववेद कांचनगंगा, अलकनंदा, शिवप्रभा मंत्री पार्क 1, आरोह सोसायटी, श्रावणधारा झोपडपट्टी, सहजानंद, शांतीवन गांधी स्मारक, किर्लोस्कर डिझेल कंपनी, लक्ष्मी नगर झोपडपट्टी, रमेश सोसायटी, डीपी रोड वरील भाग

Pune News : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

वारजे जलकेंद्रात चांदणी चौक टाकीवरील बावधन परिसर

बावधन, गावठाण, बावधन खुर्द, बावधन बुद्रुक, वैदेही एन्क्लेव्ह सोसायटी, विद्यानगर, पाषाण रोडवरील डावा आणि उजवा भाग

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.