Pune News : कामगारांची कोरोना चाचणी न केल्याने कंपनीवर दंडात्मक कारवाई

एमपीसीन्यूज : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व कामगारांची कोरोना चाचणी न करणाऱ्या कंपनीविरोधात पुणे महापालिका धनकवडी -सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाने कारवाई करून 25  हजारांचा दंड वसूल केला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये पुणे शहरातील नागरिकांनी मुख पट्टी (फेस मास्क) वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, वेळोवेळी परिसर सॅनिटाईज करणे, ग्लोव्हज वापरणे इत्यादी बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सर्व खाजगी कंपन्यांनी कंपनीकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.

धनकवडी -सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाकडील सहाय्यक महापालिका आयुक्त प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम व नरेंद्र भालेराव, आरोग्य निरीक्षक अमोल लांडगे, दिनेश सोनावणे, अब्दुल करीम मुजावर, नितीन राजगुरू, प्रमोद ढसाळ, धनाजी नवले, शांताराम सोनावणे, एकनाथ माने, प्रियांका कंक-भिंताडे यांच्या पथकाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या थर्मो टच इंडिया प्रा. लि. वर कारवाई केली.

तसेच त्यांचाकडे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट न केल्यामुळे 15  हजार आणि मायक्रो इंडिया इंजिनिअरींग लि. यांच्याकडून 10 हजार असे एकूण 25 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.