Pune : ‘कलम 370 रद्द झाल्यानंतरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख’ या विषयावर प्रा. विनय चाटी यांनी साधला वेब संवाद

Pune: On the issue of 'Jammu-Kashmir and Ladakh after repeal of Article 370', Web dialogue by Prof. Vinay Chati

एमपीसी न्यूज – विश्व संवाद केंद्र, पुणे आणि स्व. दत्तोपंत म्हसकर न्यास, चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य पत्रकार महर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने प्राध्यापक विनय चाटी यांचा ‘370 कलम रद्द झाल्यानंतरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख’ या विषयावरील वेब संवाद गुरुवारी (दि.14) आयोजित केला होता.

गुरुवारी, सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये गरवारे महाविद्यालयातील वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक विनय चाटी यांनी ‘370 कलम रद्द झाल्यानंतरचे जम्मू-काश्मीर आणि लडाख’ या विषयावरील व्याख्यानात विषयाची सविस्तर माहिती दिली. या वेब संवादासाठी पत्रकारांबरोबरच इतर नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात ऑनलाईन हजेरी लावली होती.

आद्य पत्रकार महर्षी नारद जयंतीच्या निमित्ताने दर वर्षीच पत्रकारांसाठी विश्व संवाद केंद्रातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या निमित्ताने शहरातील पत्रकार बंधूंशी संपर्क व त्यांच्या कार्याची दखल घेण्यात येते.  यावर्षी कोविड-19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक कार्यक्रम तथा एकत्रिकरणाला परवानगी नसल्यामुळे हा कार्यक्रम जाहीररीत्या होऊ शकणार नाही, हे लक्षात घेऊन पत्रकारांसाठी या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती स्व. दत्तोपंत म्हसकर न्यासाचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.