Pune : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक

एमपीसी न्यूज –  बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे (Pune) शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 5) सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नाणेकरवाडी येथे करण्यात आली.

गणेश रामचंद्र नाणेकर (वय 27, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune : सेकंड ओपिनियन लघु चित्रपट लवकरच होणार प्रदर्शित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणेकरवाडी येथील विठ्ठल मंदिराजवळ एकजण शस्त्र घेऊन आला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विठ्ठल मंदिर परिसरात सापळा लावला.

पोलिसांनी गणेश नाणेकर याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 50 हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. ते पिस्टल बाळगण्याबाबत गणेश याच्याकडे कोणताही परवाना नसल्याने त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.