Pune News : बालेवाडी येथे रविवारी भरणार पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका व पॅरा टार्गेट शुटींग असोसिएशन यांच्यावतीने रविवार (दि.18) ते 22 सप्टेंबर या कालावधित दिव्यांग खेळाडूंसाठी पुणे पॅरा जिल्हास्तरीय नेमबाजी स्पर्धा 2022-23 यांचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील 10 मीटर शुटींग रेंज फायनल हॉल येथे भरवली जाणार आहे. तरी इच्छुक दिव्यांग नेमबाज खेळाडूंनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पुणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उप आयुक्त संतोष वारुळे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.