MPC News Online Bappa : भांबुर्डेकर ज्वेलर्सच्या वतीने पाच विजेत्यांना चांदीचे नाणे प्रदान

एमपीसी न्यूज – एमपीसी न्यूजच्या वतीने गणेशोत्सवात आयोजित केलेल्या ऑनलाईन बाप्पा (MPC News Online Bappa) या घरगुती गणपती सजावट स्पर्धेतील पाच विजेत्यांना स्पर्धेचे प्रायोजक भांबुर्डेकर ज्वेलर्सच्या वतीने चांदीचे नाणे देऊन सन्मानीत करण्यात आले.

एमपीसी न्यूजने आयोजित केलेल्या या स्पर्धेस स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांची चांदीचे नाणे या बक्षिसासाठी निवड झाली आहे. त्यापैकी पाच विजेत्यांना छोटेखानी समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आले.

भांबुर्डेकर सराफ अँड ज्वेलर्स यांच्या भोसरी शाखेत ऑनलाईन बाप्पा स्पर्धेतील विजेत्यांना संचालक विलास भांबुर्डेकर यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली. त्यावेळी कार्यकारी संचालक अथर्व भांबुर्डेकर, उपसंचालक अभिषेक भांबुर्डेकर त्याचप्रमाणे भांबुर्डेकर ज्वेलर्समधील अधिकारी-कर्मचारी वर्ग व एमपीसी न्यूजचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर अनुप घुंगुर्डे प्रमुख उपस्थित होते.

या समारंभात पारितोषिक प्रदान करण्यात आलेल्या (MPC News Online Bappa) विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

1) दशरथ नवनाथ पडवळ, गंधर्वनगरी, नाशिक रोड, भोसरी 
 

2) श्रीकांत नवनाथ शेटे,मोशी 
3) सचिन प्रभू गाडे, सेक्टर 4, प्राधिकरण, मोशी 
4) पंकज हृदयनाथ शिंदे, मोशी 
5)  पूजा प्रदीप गुंजाळ चिंचवडगाव 
MPC News Online Bappa
भांबुर्डेकर ज्वेलर्सचे संचालक विलास भांबुर्डेकर यांच्या हस्ते दशरथ पडवळ यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले
भांबुर्डेकर ज्वेलर्सचे संचालक विलास भांबुर्डेकर यांच्या हस्ते पंकज शिंदे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
MPC News Online Bappa
भांबुर्डेकर ज्वेलर्सचे संचालक विलास भांबुर्डेकर यांच्या हस्ते पूजा गुंजाळ व परिवाराने पारितोषिक स्वीकारले.
भांबुर्डेकर ज्वेलर्सचे संचालक विलास भांबुर्डेकर यांच्या हस्ते सचिन गाडे यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
पारितोषिक विजेते श्रीकांत शेटे आणि परिवार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.