Pune Division Corona News : पुणे विभागात कोरोनामुक्त रुग्णांचा टक्का वाढला; 68.19 टक्के रुग्ण बरे

Percentage of corona free patients increased in Pune division; 68.19 per cent patients recovered

एमपीसी न्यूज – पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 68.12 टक्के झाले आहे. विभागातील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत वाढ झाली असून, विभागातील 95 हजार 48 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 39 हजार 526 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 878 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 600 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

रविवारी (दि. 9) रात्री नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 4 हजार 454 नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 39 हजार 526 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 93 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 758 , सातारा जिल्ह्यात 272, सोलापूर जिल्ह्यात 675, सांगली जिल्ह्यात 212 तर कोल्हापूर जिल्ह्यात 176 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 8 हजार 281 रुग्णांपैकी 79 हजार 597 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 73.51 टक्के आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 5 हजार 650 रुग्णांपैकी 2 हजार 677 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 799 आहे. कोरोनाबाधित एकूण 174 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 925 रुग्णांपैकी 7 हजार 04 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 365 आहे. कोरोनाबाधित एकूण 556 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 4 हजार 505 रुग्णांपैकी 1 हजार 433 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 936 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 10 हजार 165 रुग्णांपैकी हजार 4 रुग्ण 337 बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 563 आहे. कोरोनाबाधित एकूण 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.