Pune : बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास अटक

एमपीसी न्यूज – बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यास फरासखाना पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 30 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला.

स्वप्नील राम मोरे (वय 28, रा. नारायण पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथक गस्त घालत असताना गणेश पेठेतील उतारा चौकात एक इसम कंबरेला रिव्हॉल्वर लावून थांबला असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्याप्रमाणे पोलीस पथक त्या ठिकाणी पोहोचताच तो इसम पळून जाऊ लागला.त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ट्रॅक पॅन्टच्या पाठीमागील डाव्या बाजूस एक रिव्हॉल्वर व खिशात दोन जिवंत काडतूसे असा एकुण 30 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. रिव्हॉल्वर दहशत माजविण्यासाठी जवळ बाळगले होते अशी कबुली मोरे याने दिली. मात्र ते कोणाकडून आणले याबद्दल समाधानकारक उत्तर दिले नाही.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, संभाजी शिर्के, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार बापु खुटवड, केदार आढाव, विनायक शिंदे, अमोल सरडे, शंकर कुंभार, अमेय रसाळ, गणेश ढगे, महावीर वलटे, सयाजी चव्हाण, हर्षल शिंदे,दिनेश भांदुर्गे, विशाल चौगुले, विकास बोर्हाडे, मोहन दळवी, आकाश वाल्मीकी, मयूर भोकरे यांच्या पथकाने केली. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.