Pune : नारळाच्या झावळ्या काढणाऱ्याला झावळ्यानीच अडकवले झाडावर ; अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज- नारळाच्या झावळ्या काढणे, नारळ उतरवणे असे काम करण्यासाठी नारळाच्या झाडावर चढलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर अचानक 100 ते 150 किलो वजनाच्या झावळ्या पडल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने ती व्यक्ती झाडावरच अडकून पडली. अखेर अग्निशामक दलाच्या मदतीने शिडीच्या साहाय्याने त्या व्यक्तीची सुखरूप सुटका करण्यात आली. ही घटना आज, गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर हनुमान नगर येथे घडली.

नारळ मित्र संघटनेच्या वतीने घरोघरी असलेल्या नारळाच्या झाडावर चढून झावळ्या काढून नारळाचे झाड स्वच्छ करून देणे, नारळ उतरवून देणे असे काम करतात. त्याप्रमाणे या संघटनेचे सदस्य भास्कर जगताप हे आज, गुरुवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या हनुमाननगर मधील दर्शन बंगल्यामध्ये नारळाच्या झाडावर चढून झावळ्या काढत होते. त्यावेळी त्यांनी डोक्यावर हेल्मेट घातले होते आणि सुरक्षेची सर्व साधने घेतली होती.

झावळ्या काढत असताना अचानक 100-150 किलो वजनाच्या काही झावळ्या त्यांच्या अंगावर कोसळल्या. त्यामुळे जगताप त्या ओझ्याखाली विचित्र स्थितीत झाडावरच अडकून गेले. त्यांना सुटकेसाठी हालचाल करणे देखील अशक्य झाले.

त्वरित अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. एरंडवणे अग्निशमन केंद्रातून एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शिडी आणि दोराच्या साहाय्याने जगताप यांची सुखरूप सुटका केली. सावधगिरीचा उपाय म्हणून ज॑पीग सिट तयार ठेवण्यात आली होती. एर॑डवणा अग्निशमन केंद्राचे अधिकारी राजेश जगताप, फायरमन निलम शहाणे, स॑जय पाटील, महेश देशमुख, तन्मय घोलप, म॑दार नलावडे, चालक सतीश जगताप यांनी या कामगिरीमध्ये महत्वाची भूमिका बजावली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.