Pune : महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

एमपीसी न्यूज- पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना महापौरांच्या दालनामध्ये काल, सोमवारी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीची घटना घडली होती. त्या घटनेच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंदचे अस्त्र उगारल असून या आंदोलनात महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आणि अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर देखील सहभागी झाले होते.

राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ” नगरसेवकांकडून होणारे आरोप ऐकले पाहिजेत अशी नगरसेवकांची मागणी असते. तसेच आमच्या फाइलवर साह्य करण्याचा आग्रह केला जातो. मनपा प्रशासन विरूद्ध लोकप्रतिनिधी हा संघर्ष आहे. जलपर्णी काढण्याच्या निविदेमध्ये कोणताही गैरप्रकार घडला नसून निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा सगळा प्रकार केला हा दुर्दैवी बाब आहे. निविदा 25 कोटी असली तरी आम्ही त्याला मंजुरी दिली नव्हती. नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना आणि मला चोर म्हटले पण मला स्वाभिमान असल्यामुळे मी याला विरोध केला” काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी भडकावून चिथावणी दिल्याचा आरोप देखील निंबाळकर यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.