Pune : ‘पीएमपीएमएल’ला दरवर्षी 500 कोटी रुपये तूट!

तूट भरून देण्यापेक्षा खाजगीकरण करा -आबा बागूल यांची नाराजीपर व्यक्तव्य

एमपीसी न्यूज – ‘पीएमपीएमएल’ला दररोज एक ते सव्वा कोटी रुपये तूट येत आहे. पुणे महापालिका 250 – 300 कोटी तर, पिंपरी-चिंचवड 200 कोटी रुपये असे 500 कोटी रुपये वर्षाला तूट भरून देते. इतकी तूट भरून देण्यापेक्षा खाजगीकरण केलेले बरे, अशा शब्दांत काँगेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली.

यावेळी आबा बागुल म्हणाले, माझे 28 वे बजेट आहे. आपण सभासदांनी केवळ भाषणे करायचे नाही. अंदाजपत्रक केवळ अंदाजच राहते. वास्तव राहत नाही. ती वास्तवता कधी पूर्ण होणार की नाही, दिलेले टार्गेट का अधिकारी पूर्ण करीत नाही, याची आयुक्तांनी चौकशी करावी. सध्या टेंडर अबोव येण्याची प्रथा वाढत चालली आहे. हेमंत रासने यांना पुढचेही बजेट मांडता येईल. 3 वर्षांत केवळ घोषणांचा पाऊस झाला आहे. प्रशासनाला आकडेही नीट छापता येत नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

सुमारे 126 कोटी रुपये अधिक खर्च केले. जमेपेक्षा जास्त खर्च केले. कोणत्या अधिनियमखाली खर्च केले. सूचक-अनुमोदन सही नाही. इतर जमामध्ये 400 कोटी वाढ कशाला, आयुक्तांनी 600 कोटी धरले होते, असे बजेट सादर करू नका, 3 हजार कोटींचाही पल्लाही गाठणे अवघड होईल. प्रत्येक वर्षी 2 – 2 हजार कोटींची तूट येते. वास्तविकता बजेट करा, शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. 2009 मध्ये महसूल कक्ष स्थापन केली होती, तीच समिती आता स्थापन केली, या समिती मार्फत पैसे वाढले पाहिजे, जमेची बाजू वाढलीच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तर, 2015 लाच पुणे महापालिकेचे बजेट 10 हजार कोटी बजेट झाले पाहिजे. 400 ते 500 कोटी बजेटवर शहर चालले आहे. आधी 200 कोटींचे कर्ज काढले. त्याचे व्याज भरतोय, आणखी 200 कोटींचे कर्ज कशाला काढताच, कोट्यवधी रुपये करंटला पडून आहेत, आकाश चिन्ह 80 कोटी कसे धरले?. दरवर्षी 68 कोटी व्याज का कमी होत आहे?, 341 दावे न्यायालयात आहेत. त्यातून 1 हजार 6 कोटी रुपये, महापालिका 32 दावे आहेत. मोबाईल कंपन्याकडे कोट्यवधी रुपये थकबाकी आहे.

शासकीय इमारतीची 82 कोटी थकबाकी आहे, रोड टॅक्स उचलण्यासाठी पावले उचला, त्यात 70 टक्के हिस्सा महापालिकेचा आहे, हे पैसे आपल्याला मिळाले पाहिजे. गाड्यांसाठी पर्यावरण टॅक्स लावायला पाहिजे. दिल्लीपेक्षा भयान अवस्था पुण्याची होणार आहे. क्रेडिट बॉण्ड सक्तीचे करा, रस्ते करता येईल, अशा अनेक सूचना बागुल यांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a5aecddfa722eb',t:'MTcxNDEyNTE3OC4zMTQwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();