Pune : ट्रकचालकाचा खून करणाऱ्या चोरट्याना चार तासात अटक

एमपीसी न्यूज – ट्रकची बॅटरी चोरताना विरोध केला म्हणून चोरटयांनी ट्रकचालकाची धारदार शस्त्राने हत्या केली. ही घटना आज पहाटे अडीचच्या सुमारास मांजरी येथील द्राक्ष संशोधन केंद्राजवळ घडली. घटनेनंतर पोलिसांनी चार तासात चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या.

दत्तात्रय गंगाधर भोईटे (वय 40) असे मृत ट्रकचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकचालक दत्तात्रय हे सोलापूरला जात असताना झोप आली म्हणून त्यांनी रस्त्याच्या बाजूला आपला ट्रक उभा करून ते झोपी गेले. त्यावेळी ट्रकची बॅटरी चोरण्यासाठी तिथे चोरटे आले. चोरट्यानी एक बॅटरी काढली व दुसरी बॅटरी काढताना भोईटे यांना जाग आली. त्यांनी त्या चोरट्यांना विरोध करताना झालेल्या झटपटीत एका चोरट्याने त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केला. व त्यामध्ये दत्तात्रय गंभीररीत्या जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

हडपसर पोलिसांनी त्वरित शोध घेत हांडेवाडीच्या चार चोरट्यांच्या चार तासात मुसक्या आवळून अटक केली. पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रसाद लोणारी, संजय चव्हण, किरण लोंढे व पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांनी ही कामगिरी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.