Pune : महिला पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घालणाऱ्या महिलेस अटक

एमपीसी न्यूज – महिला पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करत हुज्जत घालणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार गुरुवारी (दि.29) सकाळी 11 च्या सुमारास डहाणूकर पोलीस चौकीसमोर घडला.

सरजु राजु टाक (वय 43, रा.कोथरुड) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलीस कॉन्स्टेबल एस.एस.देसाई यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डहाणूकर पोलीस चौकीसमोर एक महिला आरडा ओरडा करत अश्लील शिवीगाळ करत होती. त्यावेळी फिर्यादी महिला कॉन्स्टेबल एस.एस.देसाई यांनी तिला शांत होण्यास सांगितले. परंतु त्या महिलेने त्यांना धक्काबुक्की करत अपशब्द वापरले.

याप्रकरणी संबंधित महिलेस अटक करण्यात आली असून पुढील तपास अलंकार पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.