Pune : पुण्यातील 7 पोलिसांना राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक

एमपीसी न्यूज – पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणा-या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या राष्ट्रपती पदकांची यादी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील 51 तर पुण्यातील सात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.

यामध्ये पुण्याचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणातील (पीएमआरडीए) पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड, राज्य राखीव दलाच्या दौंड येथील गटाचे कमांडर श्रीकांत पाठक, चतुशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, मोटार परिवहन विभागातील पोलीस निरीक्षक विठ्ठल मोहिते, कोथरूड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दिगंबर जाखडे या अधिकारी व कर्मचा-यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या शौर्याचे व साहसाचे कौतुक करण्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देण्यात येते. महाराष्ट्र पोलिसांनी 51 पदके प्राप्त करत तीस राज्यामध्ये दुसरे स्थान पटकावले आहे. महाराष्ट्राच्या 7 पोलिसांना शौर्यापदकाने गौरवण्यात येणार असून तीन पोलिसांना उल्लेखनीय कामगिरीसाठी तर 40 जणांना गुणवत्तापुर्ण कामगिरीसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.