Pune Police : धक्कादायक! पुन्हा एकदा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपीचे पलायन

एमपीसी न्यूज : येरवडा येथील बाल निरीक्षण गृहातून 7 अल्पवयीन (Pune Police) मुले पळून गेल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा पुण्यातील कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

संतोष बाळू पवार (वय 23 रा. पानशेत) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

संतोष पवार याने मित्र साईसोबत मार्केटयार्ड (Marketyard) परिसरात भर दिवसा गोळीबार करून अंगडियाच्या कार्यालयात जाऊन दरोडा टाकला होता. यावेळी त्याने दुकानाच्या ड्रॉव्हरमधून 27 लाख 45 हजार रुपये रोख चोरून नेली होती. ज्यावेळी संतोष वापरलेल्या बंदुकीचा विल्हेवाट करण्यासाठी गंगाधाम येथे आला होता, त्यावेळी पोलिसानी सापळा रचून त्याला अटक केली होती.

Dighi News : राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर होणे गरजेचे – जनरल मनोज पांडे

काही दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी या आरोपीवर मोक्का देखील (Pune Police) दाखल केला होता. पोलिस कोठडीत असताना काल त्याची चौकशी सुरू असताना त्याने पोलिसांची नजर चुकवली आणि धूम ठोकली.

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असताना देखील आरोपी पळून जाण्याची ही दुसरी घटना पुण्यात घडली. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाही पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तरीही एकीकडे होणारी गुन्हेगारीतील वाढ आणि दुसरीकडे आरोपींचे पलायन त्यामुळे आता पोलिस प्रशासन नेमके कोणते कठोर पाऊल उचलणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.