Pune : कोरोनाचा प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार

एमपीसी न्यूज – आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रत्येक विभागाने आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांनी पार पाडावयाच्या जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. जिल्हाधिकारी राम यांनी याबाबतचा आदेश नुकताच जारी केला आहे.

अधिकारी आणि त्यांच्यावरील जबाबदारी

# निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, सहायक – विशेष कार्यकारी अधिकारी श्रीनिवास ढाणे, नायब तहसीलदार नागेश गायकवाड : केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वेळोवेळी आवश्यक ते आदेश निर्गमित करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे, कोरोना संसर्गाच्या अनुशंगाने आवश्यकतेनुसार वाहन, इमारत अधिग्रहण करणे, नेमणूक करण्यात आलेल्या सर्व अधिकारी तसेच इतर अन्य विभागाशी समन्वय ठेवून आवश्यक ती कार्यवाही पार पाडणे. तसेच कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुशंगाने सर्वसाधारण नियंत्रण ठेवून आवश्यक ती कार्यवाही पार पाडणे.

# उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सहायक तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण : विलगीकरण कक्ष व त्याचे नियमन करणे यासंदर्भात नवीन सूचनांप्रमाणे वेगवेगळया देशातून एअरपोर्टवर आलेल्या प्रवाशांची यादी प्राप्त करणे. ही यादी संबधित यंत्रणेला पुढील कार्यवाहीकरिता उपलब्ध करून देणे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे विहित नमुन्यातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे. तसेच पुणे जिल्हा कार्यक्षेत्रातील नागरिकासंदर्भात सनियंत्रणासाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सनियंत्रण करणे.

# भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी सुनिल गाढे, सहायक – नायब तहसीलदार संतोष सानप : नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून कामकाज करणे, जिल्हा नियंत्रण कक्षाकडे प्राप्त तक्रारींच्या अनुशंगाने आवश्यक ती कार्यवाही करणे, सर्व नियुक्त समन्वय अधिकारी यांच्याकडून दररोज अहवालाचे एकत्रिकरण करणे. तसेच सिव्हील सर्जन व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडील आवश्यक साहित्य खरेदीबाबत निधी उपलब्ध करण्याच्या अनुशंगाने कार्यवाही करणे.

# राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर : विमानतळावरील सर्व प्रवाशांची तपासणी होते किंवा कसे याबाबत विमानतळ अधिकारी यांच्यासमवेत समन्वय ठेवणे. तसेच पुणे विमानतळावर विदेशातून आलेल्या प्रवाशांच्या याद्या विमानतळ अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेणे. महानगरपालिका व सर्व नियंत्रण कक्षाकडे तात्काळ पाठविणे.

# मावळ, मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के : पुणे महागनरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तींशी जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी पुणे महानगरपालिका यांच्याकडून प्राप्त करणे महानगरपालिकेकडून रुग्णवाहिका प्राप्त करून घेण्यासाठी समन्वय करणे तसेच संबंधित नायडू संबंधित व्यक्तींची तपासणी करून घेण्याबाबत समन्वय साधणे.

# भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तींशी जवळच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची यादी महानगरपालिका यांच्याकडून प्राप्त करणे. महानगरपालिकेकडून रुग्णवाहिका प्राप्त करून घेण्यासाठी समन्वय करणे. तसेच संबंधित वायसीएम हॉस्पिटलमधून संबंधित व्यक्तींची तपासणी करून घेण्याबाबत समन्वय साधणे.

# अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे : पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व्हेलन्स बाबत सुरू असलेल्या कामकाजाचे अनुशंगाने माहिती घेवून नियंत्रण कक्षास कळविणे तसेच घर ते घर सर्व्हे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाकडून सर्व्हेबाबतची माहिती प्राप्त करून नियंत्रण कक्षास कळविणे.

# निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी मृणालिनी निंबाळकर : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व्हेलन्स बाबत सुरू असलेल्या कामकाजाच्या अनुशंगाने माहिती घेवून नियंत्रण कक्षास कळविणे तसेच घर ते घर सर्व्हे करण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकाकडून सर्व्हेबाबतची माहिती प्राप्त करून नियंत्रण कक्षास कळविणे.

# जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ अशोक नांदापूरकर : लॅब नेटवर्कबाबतची माहिती नियंत्रण कक्षास सादर करणे.

# उपजिल्हाधिकारी मनिषा कुंभार : सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनेवरील सर्व अधिकारी, कर्मचारी यांना संबंधित यंत्रणेकडून प्रशिक्षण देण्यात आले किंवा कसे याबाबतची खात्री करून अहवाल नियंत्रण कक्षास सादर करणे. तसेच कन्टेनमेंट प्लॅन काळजीपूर्वक अभ्यास करून आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वयक साधून याबाबत समन्वय अधिकारी यांची क्षमता बांधणी करणे.

# उपजिल्हाधिकारी सारंग कोडलकर : पुणे जिल्हयातील सर्व तारांकित हॉटेलमध्ये भारत सरकार, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, महासंचालक आरोग्य सेवा यांनी हॉटेल व लॉजिंग यांच्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होते किंवा कसे याबाबत खात्री करणे, सर्व पंचतारांकित हॉटेलमध्ये विदेशातून आलेले पर्यटक यांची तपासणी झाली आहे का, याबाबत सर्व हॉटेल चालकांकडून खात्री करणे व आपल्याकडील सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविणे.

# उपजिल्हाधिकारी निता सावंत शिंदे : भारत सरकार, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, महासंचालक आरोग्य सेवा यांनी टुर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होते किंवा कसे याबाबतचे सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्स कार्यालयाची माहिती घेणे, सर्व टुर्स अँड ट्रॅव्हल्सकडून कोरोनाग्रस्त देशात जावून आलेल्या पर्यटकांची यादी प्राप्त करून महानगरपालिका व नियंत्रण कक्षास कळविणे तसेच टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून नजीकच्या कालावधीत कोरोनाग्रस्त देशामध्ये सहली आयोजित केलेल्या असल्यास त्याबाबतची माहिती तात्काळ नियंत्रण कक्षास कळविणे.

# जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड : 24 तास अत्यावयक साहित्य पुरवठा मदत कक्षास पुरविणे, जिल्हयातील आवश्यक त्या सर्व हॉस्पीटल, विमानतळ व इतर ठिकाणी प्रतिबंधात्मक आवश्यक ती सर्व प्रकारच्या साहित्याची मागणी आरोग्य विभागाकडून प्राप्त करणे व संबंधित ठिकाणी पोहचवणे.

# उपजिल्हाधिकारी आरती भोसले : पुणे जिल्हयातील सर्व खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी विलगीकरण कक्ष तयार करण्यात आल्याबाबत खात्री व त्याची अद्यावत माहिती घेणे, पुरेशा प्रमाणात खाटांची व्यवस्था उपलब्ध असल्याबाबत खात्री करणे, खासगी रुग्णालयामध्ये खाटा राखीव करणे, खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात उपचार साहित्य उपलब्ध असल्याबाबत खात्री करणे तसेच सर्व माहिती नियंत्रण कक्षास कळविणे.

# उपजिल्हाधिकारी अजय पवार : पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या संदर्भात नियंत्रण आराखडा कन्टेनमेंट प्लॅनची अंमलबजावणी होते की नाही याबाबत खात्री करणे, सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी, सूक्ष्म आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत कार्यवाही करणे.

# उपजिल्हाधिकारी प्रविण साळुंखे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या संदर्भात नियंत्रण आराखड्याची अंमलबजावणी होते की नाही याबाबत खात्री करणे. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी.

# उपजिल्हाधिकारी श्रीमंत पाटोळे : बाहेर देशातून आलेल्या लोकांसाठी इन्स्टिटयूशनल कॉरनटाईन करण्यासाठी पुरेशी व्यवस्था असल्याबाबतची पाहणी करणे. त्याबाबतची माहिती संबंधितांना कळविणे.

# उपजिल्हाधिकारी वैशाली इंदाणी : पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावणेबाबत कार्यवाही करणे.

# जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे व उपजिल्हाधिकारी सुरेखा माने : आयसोलेशन वॉर्डमध्ये चहापाणी, जेवण, पोलीस बंदोबस्त, रग्णवाहिका इत्यादी सुविधा आहेत का याची खात्री करण्याच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीबाबत वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही करणे.

# पुणे पिंपरी चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर : सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था करणे. सर्व माहिती नियंत्रण कक्षाला कळविणे. कन्टेनमेंट प्लॅन मधील वाहनांसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करणे.

# उपजिल्हाधिकारी रामदास जगताप : कंटेनमेंट प्लॅनमधील मार्गदर्शक सूचना क्रमांक 6.3 रॅपीड रिस्पॉन्स टीम आरआरटी बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करणे. तसेच इंटर सेक्टरल कोऑर्डीनेशन करणे.

# उपजिल्हाधिकारी सचिन इथापे : पुणे महानगरपालिका हद्दीत महानगरपालिकेकडून कन्टेनमेंट प्लॅनमधील होम कॉरनटाईनबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होते किंवा कसे याची खात्री करणे. या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे.

# उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकाकडून कन्टेनमेंट प्लॅनमधील होम कॉरनटाईन बाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी होते किंवा कसे याची खात्री करणे व या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करणे.

# उपजिल्हाधिकारी सुधीर जोशी : विभागीय आयुक्त कार्यालयाशी समन्वय ठेवणे. भारत सरकार, महाराष्ट्र शासन व विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेश, सूचना जिल्हाधिकारी यांना अवगत करणे. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी समन्वय ठेवणे. आवश्यक ती माहिती आयुक्त कार्यालयात पुरवणे.

# उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल, उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख : आपल्या कार्यक्षेत्रातील कंपन्या व उद्योग घटकातील अधिकारी व कर्मचारी यांच्या परेदश दौऱ्यांबाबतचा अहवाल दररोज नियंत्रण कक्षास सादर करणे, विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी करणे. तसेच या बाबत आवश्यक ती कार्यवाही करणे व कन्टेनमेंट प्लॅनप्रमाणे गरजेप्रमाणे कार्यवाही करणे.

# जिल्हा सैनिक अधिकारी मिलिंद तुंगार : पुणे जिल्ह्यातील छावणी व कटक मंडळाच्या कार्यक्षेत्रात होम कॉरनटाईनबाबत सर्व्हेलन्स हॉस्पिटल केअरबाबत सर्व कार्यवाही करणे तसेच जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहून जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणे.

# अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे : कम्युनिकेशन मटेरियल, कम्युनिकेशन चॅनल, मास, कम्युनिकेशन डेडिकेटेड हेल्पलाइन इत्यादीबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.

# झोपडपट्टी पुनर्वसनचे उपजिल्हाधिकारी संजय पवार : जिल्हा जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक आरोग्य विभाग व शिक्षण विभाग यांच्याशी समन्वय साधत कोरोना संसर्गाचा पुणे जिल्ह्यामध्ये जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.

# कमाल जमीन धारणा कायदा उपजिल्हाधिकारी गीतांजली शिर्के : जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर ट्विटर,फेसबुक पेज इत्यादीवर कोरोना संसर्गाच्या अनुशंगाने माहिती अद्ययावत करणे.

# जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग – मीडिया मॉनीटरींग व मॅनेजमेंटबाबत आवश्यक ती कार्यवाही करणे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.