Pune: शेतमालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्राध्यापकाचा प्रयत्न

Pune: Professor's attempt to get market for agricultural products in Pune स्वतः शेतकरी पुत्र असलेले प्रा. प्रशांत चव्हाण हे पुण्यात डॉ. पी. ए. इनामदार आय.ए.एस. सेंटरचे संचालक आहेत.

एमपीसी न्यूज- शेतकऱ्यांच्या शेतमालाला पुण्यात बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रशांत चव्हाण या युवा प्राध्यापकाने प्रयत्न सुरु केले असून ‘पवनसुत शेतकरी उत्पादक संघ’ या जळगाव आणि आसपासच्या जिल्ह्यातून शेतमाल थेट पुण्यातील ग्राहकांना, सोसायट्यांना देण्यासाठी ‘संकल्प अ‍ॅग्रो फ्रेश’ हा ब्रँड तयार करण्यात आला आहे.

या उपक्रमाद्वारे उत्तम दर्जाची विषमुक्त (रासायनिक खते व कीटकनाशक मुक्त) ताज्या भाज्या, फळे, लिंबू आदी कृषी उत्पन्न थेट पुणे, पिंपरी चिंचवड आणि तळगाव परिसरात उपलब्ध करून देण्यात येत आहे.

शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना गाठण्यासाठी ‘संकल्प ‘रविवारी 5 जलै 2020 रोजी संकल्प अ‍ॅग्रो फ्रेश या संस्थेमार्फत ‘शेतातून थेट घरात’ या संकल्पनेतून पुणे, पिंपरी चिंचवड व तळेगाव दाभाडे येथे विषमुक्त (रेसिड्यू फ्री) लिंबू नागरिकांना उपलब्ध करून दिला जात आहे.

स्वतः शेतकरी पुत्र असलेले प्रा. प्रशांत चव्हाण हे पुण्यात डॉ. पी. ए. इनामदार आय.ए.एस. सेंटरचे संचालक आहेत. लॉकडाऊन काळात आणि नंतर शेतकऱ्यांच्या निर्माण झालेल्या अडचणी पाहून त्यांनी हा उपक्रम सहकारी तत्वावर शेतकऱ्यांना सोबत घेवून सुरू केला आहे.

‘अपेडा’ या शासकीय संस्थेकडून शेतमाल विषमुक्त असल्याचे प्रमाणपत्र भाजीपाला व फळे उत्पादक शेतकऱ्यांनी प्राप्त केले आहे. संपूर्ण सोसायटीतील सदस्य मागणी नोंदवित असतील तर सोसायटीत लिंबू व फळेभाज्या उपलब्ध करून दिले जातील, असे संकल्प अ‍ॅग्रो फ्रेशचे संचालक प्रशांत चव्हाण यांनी सांगितले.

या खरेदीला पहिल्या दिवशी रविवारी 5 जुलै रोजी पुणेकर नागरिकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला व नागरिकांनी पुढच्या रविवारी 12 जुलै 2020 रोजी पुन्हा मागणी नोंदवली आहे.

कोणाला होलसेल दरात उत्तम दर्जाची विषमुक्त (रासायनिक खते व कीटकनाशक मुक्त) ताजी भाजी, फळे, लिंबे हवी असल्यास 7028896981 मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आजच आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.