Pune : आयपीएचतर्फे बुधवारी स्किझोफ्रेनिया- शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे उद्या, बुधवारी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत स्किझोफ्रेनिया – शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी स्किझोफ्रेनिया – शुभंकर व शुभार्थी स्वमदत गटाचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यातील पहिला शुभंकर व शुभार्थी स्वमदत गट 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे. औषधोपचारासंबंधीच्या शंका व त्यांचे निरसन असे या गटचर्चेचे स्वरूप असणार आहे.

इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे (खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली. आत शिरल्यावर उजवीकडे चौथा बंगला ) या ठिकाणी हा स्वमदत गट होणार आहे.

हा स्वमदत गट पूर्णपणे विनामूल्य असून जास्तीतजास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्स्टिट्यूटतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.