Pune : पुणे महापालिकेत आता ‘पिंपरी – चिंचवड पॅटर्न’

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेत आता ‘पिंपरी – चिंचवड महापालिका पॅटर्न’ची चलती राहणार आहे. एका व्यक्तीला एक वर्षच पद देण्याचे धोरण आखण्यात येत आहे. महापालिकेत भाजपचे तब्बल 99 नगरसेवक आहेत. सर्वांनाच सत्तेचा लाभ हवा आहे.

_MPC_DIR_MPU_II

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपचा पराभव झाला. तर, 3 मतदारसंघांत विजय मिळविता मिळविता नाकीनऊ आले. खडकवासला मतदारसंघात तर भीमराव तापकीर केवळ 2600 मतांनी विजयी झाले. त्यामुळे आगामी काळात जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देण्यासाठी एक वर्षच कालावधी देण्यात येणार असल्याची कुजबुज आहे.

स्थायी समितीमध्येही सदस्यांना केवळ एक वर्षाचाच कालावधी मिळणार असल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. 2022 मध्ये पुणे महापालिका निवडणूक होणार आहे. ही निवडणूक आता 4 चा प्रभाग न होता 2 चा प्रभाग म्हणून घेण्यात येणार असल्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 4 चा प्रभाग झाल्याने भाजपला त्याचा फायदा झाला. सध्या राज्यात शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळे महापालिकेतील सरकारवर राज्य सरकारचे नियंत्रण राहणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या महापालिकेत भाजपमध्ये 30 ते 40 नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.