Pune : पुण्यात उष्णतेने गाठला 41 अंश तापमानाचा सर्वोच्च उच्चांक; उद्या 0.5 अंशाने वाढ होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : पुण्यात सध्या ऊन-वाऱ्याचा खेळ सुरू असताना (Pune) आज उष्णतेने 41 अंश तापमानाचा सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. यंदाच्या उन्हाळ्यातला सर्वोच्च अंक असल्याचे म्हंटले जात आहे. तर उद्या 0.5 अंशाने वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मे महिन्याची गरमी वाढली असून नागरिकांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होऊ लागली आहे.

आज मे महिन्याच्या अकराव्या दिवशी तापमानाने गाठलेल्या अंकाने बाकीचे दिवस कसे जाणार? याची चिंता वाढली आहे. तर  IMD-GFS च्या ताज्या अंदाजानुसार 14 मे पासून तापमान 40 अंशांच्या (Pune) खाली येणार आहे. परंतु, वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी शक्यतो कारणास्तव बाहेर पडू नये. बाहेर पडताना शक्य तितकी काळजी घ्यावी, व उष्माघातापासून स्वत:चा बचाव करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.