Pune : 9 वाजता 9 मिनिटांनी दिवे लावण्यासाठी पुणेकर सज्ज; रस्त्यावर येऊ नये, अन्यथा पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार लवकरच 9 वाजून 9 मिनिटांनी दिवे लावण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. मात्र, थाळीनाद वेळी पुणेकर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. आज नागरिक रस्त्यावर उतरले तर पोलीस कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे.

नागरिकांनी घरी राहूनच दिवे लावण्याचे आवाहन केले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना रस्त्यावर न येण्याचे आवाहन केले आहे. केवळ घरातील दिवे बंद करण्यात यावी, मेन स्वीटच बंद करू नये, दिवे लावताना गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाचे संकट गंभीर होत असल्याने सर्व देशवासीय एक असल्याचा संदेश यामधून देण्यात येणार आहे. 9 वाजून 9 मिनिटे वाजण्यासाठी आता काही मिनिटांचाच कालावधी शिल्लक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.