Pune News : पुणे विभागातील 60 रेल्वे मार्ग होणार जलद; वेगमर्यादा वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील साधारण 60 मार्गांवरील रेल्वेचा वेळ साधारण 15 ते 20 मिनिटांनी कमी होणार आहे. पुणे-दौंड आणि पुणे-मिरज रेल्वेची वेगमर्यादा वाढविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे  काम मंजुरी मिळाल्यानंतर लगेच सुरू करण्यात  आले होते. (Pune News) पुणे लोणावळा या मार्गावरही रेल्वे अधिक गतीने धावणार आहे. या मार्गाचेही काम सध्या सुरू आहे. रेल्वेची वेगमर्यादा वाढवण्यात येत असल्याने या मार्गावर प्रवास अधिक जलद होणार आहे.

 

सध्या पुणे-दौंड मार्गावर रेल्वेची 110 km/h वेगमर्यादा आहे. तेच पुणे-मिरज मार्गावर हे गतीचे प्रमाण 100 km/h आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार  रेल्वेची जास्त धावण्याची क्षमता असली तरीही त्याला ही वेगेची मर्यादा पाळावी लागते.

 

Chinchwad News – डायमंड जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष पदी प्रशांत गांधी यांची निवड

 

पुणे दौंड हा रेल्वे मार्गाचे काम एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तर पुणे मिरज हा रेल्वे मार्ग एप्रिलच्या शेवटपर्यंत पूर्ण होईल. एकदाचा हा रेल्वे मार्ग पुर्ण झाला की, पुणे दौंड प्रवास करणाऱ्या गाड्या 130 km/h तर पुणे मिरज प्रवास करणाऱ्या गाड्या या 110 km/h या वेगाने धावू शकतील.(Pune News) पुणे मिरज किंवा पुणे दौंड या मार्गाने असंख्य प्रवासी ये-जा करत असतात. यामुळे  या मार्गाने प्रवास करत असलेल्या प्रवाशांचा आणखीन वेळ वाचणार असून प्रवास अधितृक जलद होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.