Pune : मुंढवा आणि महंमदवाडीतील सहा रस्त्याच्या 162 कोटींच्या कामांना मुख्य सभेची मंजुरी

शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रयत्नांतून यश

एमपीसी न्यूज : पुण्यातील मुंढवा आणि महंमदवाडीतील (Pune) सहा रस्त्याच्या 162 कोटींच्या कामांच्या निधीला पुणे महापालिकेच्या स्थायी समिती आणि मुख्य सभेची मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे अनेक दिवसाच्या मागणीला माजी नगरसेवक शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रयत्नांतून यश मिळाले आहे.

पुणे शहरातील हडपसर भागातील मुंढवा आणि महंमदवाडी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. पण त्या मानाने नागरिकांना सोयीसुविधा नागरिकांना मिळत नसून त्यातील मुख्य समस्य म्हणजे रस्त्यांची असून त्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुण्यातील विश्वासू सहकारी माजी नगरसेवक शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी लक्ष वेधले असता.

मुंढवा आणि महंमदवाडीतील प्रत्येकी तीन रस्त्याच्या कामांना 162 कोटींच्या निधीला स्थायी समिती आणि मुख्य सभेने मंजुरी दिली आहे. तसेच, हे रस्ते पीपीपी तत्वावर खाजगी सहभागातून होणार आहे. या निर्णयामुळे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या प्रयत्नांतून यश मिळाले असून त्या परिसरातील (Pune) नागरिकांची वाहतूक कोंडीमधून लवकरच सुटका होणार आहे.

Chinchwad News – डायमंड जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष पदी प्रशांत गांधी यांची निवड

या रस्त्याचा होणार कायापालट –

महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रीज इस्टेटपर्यत स.नं. 40 ते स.नं. 76 मधून जाणारा 30 मी.डी.पी. रस्ता व लगत असलेले 18 मी. रस्ते विकसित करणे  – खर्च – 72 कोटी

महंमदवाडी स.नं.1, 2, 3, 4 व 57, 58, 59, 96 मधून  जाणारा 24 मी.डी.पी. रस्ता विकसित करणे – खर्च – 31 कोटी महंमदवाडी स.नं.12, 13, 30, 32 व 57 मधून जाणारा 18 मी.डी.पी. रस्ता विकसित करणे – खर्च – 16 कोटी

मुंढवा रेल्वे स्टेशन परिसरातील स.नं. 64, 66, 67, 68, 71 मधील 12 मी.डी.पी. व 24 मी.डी.पी. असे रस्ते विकसित करणे – खर्च – 48 कोटी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.