Pune : पुण्यात शनिवारी आणि रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक; लोकलसह अनेक गाड्या रद्द

एमपीसी न्यूज – खडकी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकां दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या (Pune) कामासाठी शनिवार (दि. 25) व रविवार (दि. 26) या दोन दिवशी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस यासह दहा गाड्या रद्द केल्या आहेत. तसेच या दोन दिवसात पुणे-लोणावळा दरम्यानच्या 46 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Mahavitran : ट्रान्सफॉर्मर जळाला तर महावितरणला कळवा; महावितरणचे आवाहन

रद्द केलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 12123 सीएसएमटी – पुणे एक्सप्रेस डेक्कन क्वीन (शनिवारी रद्द)
गाडी क्रमांक 11009 सीएसएमटी – पुणे एक्सप्रेस सिंहगड एक्सप्रेस (शनिवारी रद्द)
गाडी क्रमांक 12127 सीएसएमटी – पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस (रविवारी रद्द)
गाडी क्रमांक 11007 सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्सप्रेस (रविवारी रद्द)
गाडी क्रमांक 11029 सीएसएमटी – कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (रविवारी रद्द)
गाडी क्रमांक 12124 पुणे – सीएसएमटी एक्सप्रेस डेक्कन क्वीन (रविवारी रद्द)
गाडी क्रमांक 11010 पुणे – सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस (रविवारी रद्द)
गाडी क्रमांक 11008 पुणे – सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस (रविवारी रद्द)
गाडी क्रमांक 12128 पुणे – सीएसएमटी इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस (रविवारी रद्द)
गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर – सीएसएमटी कोयना एक्सप्रेस (रविवारी रद्द)

उशिराने धावणा-या गाड्या
गाडी क्रमांक 16332 तिरुअनंतपुरम – मुंबई एक्सप्रेस – दोन तास उशिराने धावेल (शनिवारी)
गाडी क्रमांक 22194 ग्वालियर – दौंड साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस – दीड तास उशिराने धावेल (शनिवारी)
गाडी क्रमांक 22943 दौंड – इंदौर सुपरफास्ट एक्सप्रेस – चार तास उशिराने धावेल (रविवारी)
गाडी क्रमांक 12939 पुणे – जयपूर सुपरफास्ट एक्सप्रेस – दोन तास उशिराने धावेल (रविवारी)
गाडी क्रमांक 22106 पुणे – मुंबई इंद्रायणी सुपरफास्ट एक्सप्रेस – २५ मिनिटे उशिराने धावेल (रविवारी)
गाडी क्रमांक 22150 पुणे – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस – एक तास उशिराने धावेल (रविवारी)

नियमित केलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 11302 बेंगलोर – मुंबई उद्यान एक्सप्रेस (शनिवारी)
गाडी क्रमांक 16506 बेंगलोर – गांधीधाम एक्सप्रेस (शनिवारी)
गाडी क्रमांक 22159 मुंबई – चेन्नई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस (रविवारी)
गाडी क्रमांक 17222 एलटीटी – काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस (रविवारी)
गाडी क्रमांक 11019 मुंबई – भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस (रविवारी)
गाडी क्रमांक 22732 मुंबई – हैद्राबाद सुपरफास्ट एक्सप्रेस (Pune) (रविवारी)

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.