Pune : पुण्यात 2 फेब्रुवारी रोजी ‘ राष्ट्रीय कीर्तन’ कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Pune) सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ह.भ.प.चारुदत्त आफळे यांच्या ‘ राष्ट्रीय कीर्तन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राममंदिर ते राष्ट्रमंदिर’असा या कीर्तनाचा विषय आहे.

Wakad : महिलेच्या बँक खात्यातून परस्पर सुमारे दोन लाख लंपास

हा कार्यक्रम शुक्रवार,2 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.त्यांना प्रसाद करंबेळकर(तबला), सौ.रेशीम खेडकर (हार्मोनियम) हे साथसंगत करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा 193 वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.