Pune Rural Crime News : दौंड तालुक्यातील वाळू तस्करांवर पोलिसांची मोठी कारवाई, अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : भीमा नदीपात्रात अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍यांवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली. पोलिसांनी आठ ग्रामीण वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करीत तब्बल अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दौंड तालुक्यातील शिळापूर गावच्या हद्दीत असणार्‍या भीमा नदीच्या पात्रात वाळूचा उपसा केला जात होता. दौंड पोलिसांनी ही कारवाई करताना 9 फायबर बोटी, आठ सेक्सन बोटी, एक जेसीबी, 30 ब्रास वाळू असा एकूण दोन कोटी 36 लाख 25 नष्ट जप्त केला.

तसेच या प्रकरणी आठ जणांविरोधात दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

तीन दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी एक कोटी 20 लाखाच्या अवैधरित्या वाळू उपसा करणार्‍या बोटी नष्ट केल्या होत्या आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.