Pune Sangeet Mehfil: स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सांगितिक कार्यक्रम

एमपीसी न्यूज: सानिया पाटणकर (जयपूर घराण्याच्या गायिका )यांच्या प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशन संस्थेतर्फे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता पत्रकार भवन नवी पेठ गांजवे चौक येथे संगीत मैफीलीचे आयोजन केले आहे.(Pune Sangeet Mehfil) त्यामध्ये पुण्याबरोबरच मुंबई,नवी दिल्लीतील शास्त्रीय गायक वादक पुण्याला येऊन आपली कला सादर करणार आहेत. दिनांक 24 रोजी नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावे याकरता प्रेरणा संस्थेचे विद्यार्थी तसेच बाहेरील काही नवोदित कलाकारांचे कला सादरीकरण याठिकाणी होईल.

Pashan News : “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथे “समूह राष्ट्रगीत गायन”

दिनांक 25 रोजी ,अभय अमर ओक (बासरी), श्री राजस उपाध्ये (व्हायोलिन,) पंडित जसराज यांचे शिष्य पंडित लोकेश आनंद ,दिल्ली (शहनाई ), ग्वाल्हेर घराण्याचे गायक पंडित अमरेंद्र धनेश्वर ,मुंबई गायन आणि जयपूर घराण्याच्या सूरमणी सानिया पाटणकर आपली कला सादर करतील.(Pune Sangeet Mehfil) सर्व कलाकारांना साथ संगत पंडित रामदास पळसुले, आशय कुलकर्णी, सचिन पावगी, कार्तिकस्वामी दहिफळे, प्रज्ञा देसाई, तुषार केळकर, माधव भागवत करणार आहेत. आणि कार्यक्रमाचे निवेदन सौ मंजिरी चौधरी तीक्का आणि श्री विलास रवंदे हे करतील अशी माहिती प्रेरणा संस्थेचे ट्रस्टी श्री नितीन महाबळेश्वरकर यांनी दिली. सर्वांना प्रवेश विनामूल्य आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.