Pune : दुसऱ्या ‘खेलो इंडिया वुमन्स लीग’ला सुरुवात; 14 प्रकारांमध्ये 300 खेळाडूंचा सहभाग

एमपीसी न्यूज – भारतीय क्रीडा प्राधिकरण, प्रादेशिक केंद्र, मुंबई यांनी महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने (Pune) दुसरी खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीग (शहर/विभागस्तर) 2023 ही स्पर्धा पुणे येथे आयोजित केली आहे. या स्पर्धेला आज (शुक्रवार, दि. 22) पासून सुरुवात झाली आहे.

बाबूराव सणस मैदान, सारसबाग, पुणे येथे या स्पर्धा सुरु आहेत. देशभरातील प्रत्येक शहरातील सुमारे 300 खेळाडू 14 स्पर्धा प्रकारांमध्ये (ट्रॅक आणि फील्ड आणि रोड इव्हेंट श्रेणींमध्ये) सहभागी झाले आहेत. एक खेळाडू जास्तीत जास्त 2 प्रकारांमध्ये सहभागी होऊ शकतो.

ट्रॅक आणि (Pune) फील्ड: 100 मी, 200 मी, 400 मी, 800 मी, 1500 मी, 5000 मीटर धावणे; लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, थाळी फेक, भालाफेक इत्यादी क्रीडा प्रकार या स्पर्धेत होणार आहेत.

Bhosari : जागेवर ताबा मारण्याची धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी

खेलो इंडिया महिला ॲथलेटिक्स लीगमध्ये महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यातील महिला खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. धावणे, उडी, थ्रो आणि रोड रेस यासह विविध ट्रॅक आणि फील्ड क्रीडा प्रकारात खेळाडूंना कौशल्य दाखविण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे.

खेळाडूंना स्पर्धा करण्यासाठी आणि करिअर म्हणून क्रीडा क्षेत्रात त्यांचे पाऊल भक्कम करण्याच्या उद्देशाने या खेलो इंडिया महिला लीगचे आयोजन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.