Pune : महापालिकेत सुरक्षा जमादाराची दारू पार्टी; व्हिडिओ व्हायरल

Security Jemadar's liquor party in the municipality; Video goes viral; सुरक्षा विभागाकडून नोटीस

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिकेतील  मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले मुख्य जमादारच दररोज महानगरपालिकेत राजरोसपणे दारूच्या पार्ट्या करत आहेत. काही सेवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या जमादाराने त्या सेवाकाशी हातापायी करण्यास सुरवात केली. त्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

या व्हिडीओत सुरक्षा जमादार शिवीगाळ करीत असल्याचेही दिसते. एकमेकांना ‘तू बाहेर चाल, बघून घेतो’, अशा प्रकारचा संवादही या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळत आहे.

पुणे महापालिकेतच अशा प्रकारे दारू पार्टी होत असल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची वरिष्ठांकडून गंभीर दाखल घेण्यात आली आहे.

या संदर्भात सुरक्षा विभागाचे प्रमुख संदीप कदम यांच्याशी संपर्क केला असता, हा प्रकार रविवारी रात्री झाल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेप्रकरणी संबंधितांना 24 तासांत खुलासा करण्याची नोटीस देण्यात आली आहे.

त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, सध्या पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांपासून अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.

सध्या शहारत 28 हजारांहून अधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 18 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

तर, दुसरीकडे महापालिकेतच अशा प्रकारे दारू पार्टी होत असल्याने खमंग चर्चांना उत आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.