_MPC_DIR_MPU_III

Pune : ‘लॉकआऊटनंतरच्या मूलभूत समस्या व निराकरण’ यावर मराठी विज्ञान परिषदेतर्फे गुरुवारी परिसंवाद

Seminar on 'Fundamental Problems and Solutions after Lockout' on Thursday by Marathi Vigyan Parishad

एमपीसी न्यूज – मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने ‘लॉकआऊटनंतरच्या मूलभूत समस्या व निराकरण’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे. गुरुवार (दि.11)  सायंकाळी 6:30 वाजता गुगल व्हर्च्युअल बोर्डरुमवरून या परिसंवादाचे प्रक्षेपण होणार आहे.

या परिसंवादात ‘मानसिक ताण’ या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ आरती पेंडसे मार्गदर्शन करणार  आहेत. मानसिक तणाव दृश्य आणि अदृश्य असला तरी त्याची दखल आपल्या संस्कृतीत सहज  घेतली  जात नाही.

लॉकआऊट संपल्यानंतर मानसिक समस्या व त्याला सामोरे कसे जायचे, याबद्दल त्या सविस्तर माहिती देणार आहेत.

_MPC_DIR_MPU_II

‘कौटुंबिक समस्या’बाबत माजी समाज कल्याण आयुक्त शशिकांत सावरकर व ज्योती पठानिया मार्गदर्शन करणार आहेत.

जीवनोपयोगी वस्तूची उपलब्धता याविषयी पुणे मर्चन्ट चेम्बर्सचे सचिव विजय मुथा माहिती देणार आहेत. तर श्रद्धास्थाने या विषयावर विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, पंढरपूरचे सदस्य शिवाजीराव मोरे बोलणार आहेत.

इच्छुक नागरिकांना “https://meet.google.com/frd-afhg-vwq”या लिंकवरून परिसंवादात सहभागी होता येणार आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1