Pune : खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे नेते रमेशबापू कोंडे यांची बंडखोरी

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजपची युती झाली असली तरीही खडकवासला मतदारसंघातून शिवसेनेचे नेते रमेशबापू कोंढरे यांनी बंडखोरी केली. भगवे ध्वज उंचावीत, वाजत-गाजत, कार्यकर्त्यांनी जल्लोष करून कोंडे यांचा तहसीलदार कार्यालय शुक्रवार पेठ येथे आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

भाजपने शहरातील 8 ही जागांवर उमेदवार उभे केले. वारंवार मागणी करूनही शिवसेनेला 1 ही जागा सोडण्यात आली नाही. कसबा पेठ मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी केली आहे. या उमेदवारांची पक्ष काशी समजूत घालणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.