pune धक्कादायक; परदेशवारी न करताही पुणेकर महिला कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज : परदेशवारी न करता तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संर्पकात न येताही एका ४१ वर्षीय पुणेकर महिलेला कोरोनाची लागन झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या महिलेवर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या बाबत सरकारी यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या या महिलेला सुरुवातीला श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना सोमवारी ( दि. १६) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या घशातील द्रव पदार्थांचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले.

मात्र, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालात या महिलेला स्वाइन फ्लूच्या ‘एच1एन1’चा संसर्ग झाला नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर केलेल्या ‘कोविड 19’ विषाणूच्या चाचणीत संबंधित महिला पॉझिटिव्ह आढळून आल्याचे खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

या कोरोनाबाधित महिलेने परदेशवारी केलेली नसल्याचे समजते. तसेच परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कातही ही महिला आली किंवा नाही याचीही माहिती मिळालेली नाही. मग तिला कोरोनाचा संसर्ग कसा झाला, याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली जात आहे.

दरम्यान, या कोरोनाबाधित महिला रुग्णावर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1