Pune Singapore flight : पुण्यातून थेट सिंगापूरला जाता येणार, पुणे-सिंगापूर विमानसेवेला हिरवा कंदील

एमपीसी न्यूज : पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मान्यता मिळाली आहे . मागील अनेक दिवसांपासून प्रवाश्यांना या विमानसेवेची प्रतीक्षा होती मात्र अखेर या विमानसेवेला हिरवा कंदील मिळाला आहे. 2 डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे.(Pune Singapore flight) मागील महिन्यात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या विमासेवेबाबतचा प्रस्ताव आहे, असं  जाहीर  केलं  होतं.

पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा आठवड्यातून चार दिवस असणार आहे. म्हणजेच आठवड्यात सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारीच या सेवेचा पुणेकरांना लाभ घेता येणार आहे.(Pune Singapore flight) पुण्यातून आंतरराष्ट्रीय  विमानसेवा सुरु करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानुसार आता पुणे सिंगापूर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. येत्या काळात बँकॉक आणि दोहा या ठिकाणी विमानसेवा सुरु होण्याची  शक्यता आहे.

Today’s Horoscope 16 October 2022-जाणून घ्या आजचे राशिभविष्य

यामुळे आता पुणे ते सिंगापूर प्रवास 8 तासात तर सिंगापूर ते पुणे प्रवास 4 तासात पूर्ण होणार आहे. या विमानसेवेचा फायदा व्यावसायिकांना आणि विविध क्षेत्रात (Pune Singapore flight)  काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासाठी तिकीट दर देखील जाहीर करण्यात आले आहेत आणि दिवसातून 2 फेऱ्या असणार आहे. त्यामुळे प्रवाश्यांना सोयीनुसार प्रवास करणं शक्य होणार आहे.

 

किती असतील तिकीट दर?
– 17 हजार 799 रूपये (इकॉनॉमी)
– 32 हजार 459 रूपये (प्रिमियम इकॉनॉमी)
 – 82 हजार 999 रूपये (बिझनेस क्लास)

दिवसभरात 2 फेर्‍या 
1) पुणे-सिंगापूर – दु.2 वाजून 10 मिनिटे – रात्री 10 वाजून 30 मिनिटे 
2) सिंगापूर ते – पुणे स.11 वाजून 50 मिनिटे – दु.3 वाजून 15 मिनिटे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.