Maval News : कविता गायन, वक्तृत्व, संभाषण स्पर्धेसह विविध उपक्रमांनी वाचन प्रेरणा दिवस साजरा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील भाजे येथील विद्या प्रसारिणी सभेच्या श्री विद्या बालक मंदिर प्राथमिक शाळेत कविता गायन,वक्तृत्व,संभाषण अशा विविध उपक्रमांनी वाचन प्रेरणा दिवस (Maval News) साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्म दिवस  “वाचन प्रेरणा दिन” म्हणून  साजरा केला जातो. सर्व शाळांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी विना दप्तराची शाळा भरते. विद्या प्रसारिणी सभेच्या भाजे येथील श्री विद्या बालक मंदिर प्राथमिक शाळेतही ‘वाचन प्रेरणा दिन’ विविध विद्यार्थीप्रिय उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी विविध कथा, माहिती, निबंध, कविता ,वृत्तपत्रे तसेच सामान्य ज्ञानावर आधारीत विविध पुस्तकांचे मैदानावर बसून आनंदाने वाचन केले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवनाची सुरूवात अतिशय खडतर झाली. त्यावर त्यांनी मोठ्या जिद्दीने मात करून विज्ञान शाखेची पदवी संपादन केली.(Maval News) त्यानंतर शास्त्रज्ञ म्हणून तसेच नंतर संचालक पदावर संरक्षण दलात ते सहभागी झाले. त्यांच्या कारकीर्दीत त्रिशूल, पृथ्वी, अग्नी अशा अग्निबाणांची तसेच अर्जुन सारख्या अत्त्याधुनिक रणगाड्यांची निर्मिती झाली.

Pune Singapore flight : पुण्यातून थेट सिंगापूरला जाता येणार, पुणे-सिंगापूर विमानसेवेला हिरवा कंदील

डॉ.कलाम यांनी माजी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून देखील काम पाहिले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती पदावर विराजमान होवून देशाला बलशाली बनविण्यासाठी तिन्ही (Maval News) संरक्षण दलांच्या मजबुतीकरणासाठी कार्यांना दिशा दिली. त्यांना भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार असे अनेक पुरस्कार देखील मिळाल्याची माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.

संस्थेचे नियामक मंडळ अध्यक्ष डॉ.गो.व्य. शिंगरे आणि कार्यवाह डॉ. स.भा. गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबवले गेले. शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती रगडे यांचे नियोजन आणि श्री विद्या बालक मंदिरच्या शिक्षिका सुषमा येवले,अनुजा वाघमारे,रेखा गोणते,काजल रणदिवे,सीमा सिंग,शिल्पा आंबेकर,संगीता पवार इत्यादी शिक्षिकांच्या व शाळेतील  सर्व  विद्यार्थ्यांच्या  सहभागातून वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.