Pune : मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

एमपीसी न्यूज – भारत निवडणूक आयोगाच्या (Pune) निर्देशाने 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.

Chinchwad : अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कामगिरी; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 41 किलो गांजा पकडला

पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत 1 जून 2023 ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा व मतदान केंद्रांच्या सीमांच्या पुर्नरचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक (Pune) फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येईल. 30 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2023 या कालावधीत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येणार आहे.

एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी 17 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 17 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमेअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तर 26 डिसेंबर 2023 पर्यंत दावे व हरकती निकाली काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2024 रोजी करण्यात येणार आहे.

Wakad : पिस्टल बाळगल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.